advertisement

UAEच्या धाडसाने जग हादरलं, इराणवर पहिल्यांदाच थेट हल्ला,'लाईफलाईन' कापली; तेल नव्हे सर्वात मोठी 'कमजोरी'वर हवाई हल्ले

Last Updated:

UAE Strike Iran: मिडल ईस्टमधील युद्ध अधिक तीव्र होत असताना संयुक्त अरब अमिरातने पहिल्यांदाच इराणविरोधात थेट लष्करी कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. यूएई वायुसेनेने इराणच्या महत्त्वाच्या डिसॅलिनेशन वॉटर प्लांटवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
तेहरान: मिडिल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या युद्धाच्या नवव्या दिवशी संयुक्त अरब अमिरात (UAE)ने पहिल्यांदाच इराणविरोधात थेट लष्करी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत संरक्षणात्मक भूमिकेत असलेल्या यूएईने आता आक्रमक पवित्रा घेत इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हवाई हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.
इस्रायली माध्यमांच्या माहितीनुसार यूएईच्या वायुसेनेने इराणच्या डिसॅलिनेशन (समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या) प्लांटवर हवाई हल्ला केला. हा प्लांट इराणच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे पाण्याची पुरवठा साखळी खंडित करणे ही इराणची मोठी ‘कमजोरी’ लक्ष्य करण्याची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार अमेरिकन आणि इस्रायली तेलसंबंधित सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर हा प्रत्युत्तरात्मक हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. इस्रायली पोर्टल Ynetच्या वृत्तानुसार युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच यूएईने थेट आक्रमण करत इराणच्या पायाभूत सुविधांवर लक्ष्य केले आहे. या कारवाईमुळे मध्यपूर्वेतील युद्ध अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
दरम्यान या हल्ल्याबाबत इराण किंवा यूएईकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र या घडामोडींमुळे आधीच तणावपूर्ण असलेले मध्यपूर्वेतील वातावरण आणखी धोकादायक बनण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. युद्धाचा विस्तार होत असल्याने जागतिक स्तरावरही चिंता वाढत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
UAEच्या धाडसाने जग हादरलं, इराणवर पहिल्यांदाच थेट हल्ला,'लाईफलाईन' कापली; तेल नव्हे सर्वात मोठी 'कमजोरी'वर हवाई हल्ले
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement