या पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकार अधिवेशन घेण्याचे नाटक करत आहे. फक्त आठवड्यांचे अधिवेशन आहे, लक्षवेधी नाहीये. आम्ही विरोधी पक्ष म्हणून संख्येने कमी असलो तरी आम्ही सरकारला विरोध करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ईव्हिएमवर आलेले हे सरकार आहे. मारकडवाडी आणि इतर गावात ईव्हिएमवर विरोध करणारी गावातील लोकांना अटक करणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना हमीभाव न देणारे हे सरकार आहे, सरपंचाची दिवसा ढवळ्या हत्या करणारे हे सरकार आहे. कारागृहात तरूणांची हत्या करणारे हे सरकार आहे. या खूनी सरकारने आम्हाला चहापानाचे निमंत्रण दिले. या सरकारच्या तहापानावर आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार घालणार आहोत,असे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. शेतकरी आत्महत्या होतायत, सरकारी पक्षाच्या सरपंचाची हत्या होतेय पण अजूवही शपथवीधी पार पडला नाही, आजही हे सरकार लोकांना मंत्री देऊ शकत नाही,असा हल्ला देखील दानवेंनी यावेळी चढवला.
advertisement
उद्यापासून हे अधिवेशन होत आहे. पण किमान १५ दिवस अधिवेशन चालवायला हवे होते, असे काँग्रेस नेते
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय,उद्योगधंदे बाहेर गेले आहेत.सोयाबीन शेतकरी रडतोय. सरकारने दिलेले आश्वासन हे पाळली पाहीजे. कायदा सुव्यवस्था संपली आहे. या राज्यातील सामान्य माणूसासाठी काहीच राहीलेलं नाही. म्हणून आम्ही चहापाणावर बहिष्कार घातला आहे, असे वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.
आंबेडकरी विचारसरणीच्या एका व्यक्तींचा कारागृहात मृत्यू होतो. हे काल महाराष्ट्राने पाहिले आहे. या घटनेवर आम्ही शांत बसणार नाही. परभणीत झाले त्याचे काय करायचे हे आम्ही आजच ठरवू.बीडमध्ये ज्या प्रकारची हत्या झाली. अशी राजकीय हत्या आजवर झाली नाही. त्यातील आरोपी वाल्मिक कराड हा राजकिय व्यक्तीच्या जवळचा आहे. वाल्मिक कऱ्हाड हा कधी ही कुणालाही उचलतो. आणि काहीही करतो. याची दखल घेतली जात नाही. पोलिस त्याला उत्तर देत नाहीए पोलिस आरोपींबरोबर चहापान करतायत. बीडच्या माध्यमातून हे सरकार कसे चालणार आहे यांचे हे चित्र स्पष्ट आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
तसेच मारकडवाडीला चिरडून टाकणारे हे सरकार आहे. यांनी सर्वांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्ष सक्षमतेने आम्ही काम करू. एकत्रीतरित्या पाशवी बहुमतांशी आम्हाला लढावे लागणार आहे.आम्ही उद्या दलित संघटनाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे तत्वता मान्य करत आहोत, असे आव्हाडांनी सांगितले.
तुम्ही बहिणीची संख्या कमी करू नका. सरसकट बहीणींना 2100 रूपये द्या. सगळ्या भरती या एमपीएसस्सी मधून भरा. हे सरकार आल्यापासून बीड आणि परभणीत जी राजकिय हस्तक्षेप करून निर्घृण हत्या केली,अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
