TRENDING:

गंगापूर पंचायत समितीचा अंतिम निकाल, तिरंगी लढतीत कुणाचा गुलाल? पाहा Live Updates

Last Updated:

गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात होत असताना राजकीय चित्र स्पष्ट होत चालले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. तब्बल नऊ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या या निवडणुकीत यावेळी थेट तीन आघाड्यांमध्ये लढत रंगली आहे. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर तालुक्यात भाजप–शिवसेना (शिंदे गट), दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच उबाठा–काँग्रेस–वंचित आघाडी अशी त्रिकोणी राजकीय लढत पाहायला मिळाली.
गंगापूर तालुक्यात ZP–PS मतमोजणीसाठी राजकीय हालचाली
गंगापूर तालुक्यात ZP–PS मतमोजणीसाठी राजकीय हालचाली
advertisement

आता गंगापूर तालुक्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. इथं भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने १६ पैकी सहा जागा जिंकल्या आहेत.  इथं दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. तर शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट आणि अपक्षांना प्रत्येकी दोन जागा जिंकता आल्या. तर एमआयएमला एका जागेवर समाधान मानावं लागलं.

गंगापूर पंचायत समिती अंतिम निकाल २०२६ ( एकूण जागा -१८)

advertisement

भाजप : 6

शिवसेना : 2

शिवसेना UBT:2

NCP : 5

एमआयएम : 1

इतर : 2

गंगापूर जिल्हा परिषद गटातील लढती कशा आहेत?

जामगाव गट -भाजप–शिवसेना युतीच्या स्वाती दिलीप निरफळ यांच्याविरोधात अपक्ष दीपा सचिन मुंदडा यांच्यात सरळ सामना झाला.

नेवरगाव गट- जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या काळात हा गट सर्वाधिक चर्चेत राहिला. भाजपच्या सुरेखा नितीन वालतुरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या वैजयंती वाल्मीक शिरसाठ, उबाठाच्या वैशाली सुहास सोनवणे आणि दीपाली बद्रीनाथ चव्हाण रिंगणात असल्याने या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

advertisement

शिल्लेगाव गट-  राष्ट्रवादीच्या शोभा सुभाष भोसले विरुद्ध भाजपच्या सविता संतोष जाधव यांच्यात थेट लढत.

शेंदूरवादा सर्कल - गंगापूर कारखान्याचे चेअरमन व शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर स्वतः मैदानात. भाजपचे सचिन विधाटे, राष्ट्रवादीचे विक्रम राऊत आणि एमआयएमचे राहुल डोळे यांच्याशी थेट लढत.

तुकाबाद सर्कल - राष्ट्रवादीच्या मनीषा ज्ञानेश्वर सिदलंबे यांच्या विरोधात भाजपच्या स्वाती योगेश पाटेकर आणि उबाठाच्या कुशावर्ता कडुबा हिवाळे.

advertisement

अंबेलोहोळ गट - राष्ट्रवादीचे विलास जयवंत सौदागर, भाजपचे रतन दादा बतीसे आणि शिवसेना उबाठाचे संतोष नारायण गायकवाड यांच्यात त्रिकोणी सामना.

एमआयएम, अपक्षांचा प्रभाव

वाळूज गट

राष्ट्रवादीचे बालाजी सोनटक्के, भाजपचे जयकुमार माने, वंचितचे रूपचंद गाडेकर आणि एमआयएमचे अनिल साळवे यांच्यात अटीतटीची लढत.

लासूर सांवगी गट

भाजपच्या संगीता आमराव, राष्ट्रवादीच्या पुष्पा परोडकर आणि उबाठाच्या अमृता आमराव यांच्यात सरळ लढत.

advertisement

रांजणगाव शे. पुं. गट

भाजपचे अमोल लोहकरे, राष्ट्रवादीचे नितीन शेजवळ आणि वंचितचे मनोहर गवई यांच्यात चुरस.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहानपणी ऊसतोडणी, शिक्षण अर्धवट पण हार नाही मानली, उभा केला मसाल्यांचा ब्रँड, माया यांच्या यशाची कहाणी Video
सर्व पहा

काही गटांमध्ये एमआयएम व अपक्ष उमेदवारांचे मत विभाजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या गणांमध्येही जिल्हा परिषद गटांप्रमाणेच राजकीय समीकरणे दिसत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गंगापूर पंचायत समितीचा अंतिम निकाल, तिरंगी लढतीत कुणाचा गुलाल? पाहा Live Updates
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल