TRENDING:

Nanded: दुचाकीसोबत तो जळाला, अंगातून स्फोट कसे काय झाले? नांदेड जळीत प्रकरणावर पोलिसांचा खुलासा

Last Updated:

काही लोकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनच पोलिसांनी केलं आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड : उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाहनांना आग लागल्याची घटना घडत आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका दुचाकीला आग लागली आणि  दुचाकीसह एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला. पण, त्या तरुणााच्या अंगातून स्फोट होत होते असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सगळ्या बाजूने तपास करत आहे.  काही लोकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनच पोलिसांनी केलं आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळच्या वाजेगाव बंधाऱ्यावर आज शनिवारी सकाळी एक व्यक्ती दुचाकीसह जळून मृत्यू झाला. उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली . जळताना गाडीतून आणि जळत असलेल्या व्यक्तीच्या अंगातून अनेक स्फोट झाले, असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आणि शहर भरात वाऱ्या सारखी बातमी पसरली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.  या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितलं. घटनास्थळी काही साहित्य मिळाले, ते जप्त करुन तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहे. मयत व्यक्तीची ओळख पटली आहे. तपासाचा भाग म्हणून त्याची ओळख सार्वजनिक करण्यात आली नाही. अधिक तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. या घटनेचा सर्व अँगल तपास सुरू आहे. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक अँगलने तपास सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव म्हणाले.

advertisement

अफवांवर विश्वास ठेवू नका

काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे. फॉरेसिक, एटीएस आणि अन्य यंत्रणा मार्फत देखील तपास सुरू आहे. तपासातून जो काही निष्कर्ष निघेल तो समोर येईल, असं सूरज गुरव यांनी स्पष्ट केलं.

घातापाताचा संशय आहे का?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत काय आहे? नववी नापास पुणेकरानं सुरू केला बिझनेस, 16 हजार गुंतवणूक अन् लाखोंची उलाढाल, Video
सर्व पहा

अपघात झाला तेव्हा तो जळताना स्फोट कशाचे, तो कोणत्या संघटनेचा आहे का, त्याचा हेतू काय याचा तपास सुरू आहे. सद्या त्या व्यक्तीची प्राथमिक माहिती आहे. त्यावरुन तपास सुरू आहे. घटनास्थळी मिळालेले साहित्य आणि प्रत्यक्षदर्शनीचे जवाब यातून काही निष्कर्ष निघाले आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: दुचाकीसोबत तो जळाला, अंगातून स्फोट कसे काय झाले? नांदेड जळीत प्रकरणावर पोलिसांचा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल