रायगडच्या खोपोली मधील मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादीवर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप करत या मागचा आका सुतारवाडीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुनील तटकरे यांनी कर्जतमध्ये आज पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. "काळोखे यांचा हत्याकांडाची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटी मागणी करणार आहोत. शिवाय या हत्येच्या घटनेनंतर काय आहे हे सर्व बाहेर येईल, तोपर्यंत सगळ्यांनी शांतता आणि संयम बाळगावा", असं आवाहन सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
advertisement
तसंच, या प्रकरणात मी जाहीरपणे काही बोलू इच्छित नाही. पण शांतता बाळगा. अनेक वेळा शांततेत राहिल्यामुळे सत्य हे समोर येतं. त्यामुळे अत्यातायी पणे बोलण्याची घाई नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. इथं जे काही सुरू आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलं आहे. त्यामुळे भाष्य करू इच्छित नाही. कारण सत्य हे सत्य आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणं माझं काम आहे. तपासातून सगळं काही बाहेर येईल' असंही तटकरे म्हणाले.
शिवसेनेच्या आमदारांनी काय केला होता आरोप
" या प्रकरणात सुनील तटकरे हे आका आहेत. बीडमध्ये जे घडलं तेच रायगडमध्ये रक्तरंजीत राजकारण घडत आहे. त्यांना सत्येचा माज आहे. राष्ट्रवादीकडून मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चुकीचे वक्तव्य करत आहे. एफआयआरमध्ये सुधाकर घारे याचं नाव आहे. पण, तटकरे हे सुधाकर घारे याला निर्दोष असल्याचं सांगत आहे. कोणत्याही प्रकाराचा तपास झाला नाही. पोलिसांनी अजून नीट तपास सुरू केला नाही. तरी सुनील तटकरे हे सुधाकर घारे हा निर्दोष असल्याचं सांगत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर यांचा दबाव आहे. सुनील तटकरे फोन करत आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.
