जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी विकास जाधव आणि नारायण लोखंडे हे तरुण शेतकरी भोकरदन तहसील कार्यालय समोर मागील अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन करत होते. आंदोलनाला अनेक दिवस उलटल्यानंतरही तहसीलदार आणि प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे आंदोलकांनी मंगेश साबळे यांच्याशी संपर्क साधला आणि साबळे यांनी तत्काळ प्रतिसाद देत पोतराजाच्या विषयामध्ये डफडं वाजून अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धारेवर धरलं. मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांचा विषय लावून धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या.
advertisement
परंतु आंदोलन करते साबळे आणि त्यांच्या सहकार्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि 31 डिसेंबर 2025 रोजी कायद्याच्या विषयामध्ये आंदोलन केलं. यावेळी सरकार हमसे डरती हे पोलीस को आगे करती है, शेतकऱ्यांना न्याय माग न गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली ही दोन्ही आंदोलने परिसरात चर्चेचा विषय ठरली. तसेच प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचा देखील ऊहापोह नागरिकांकडून केला जातोय. दरम्यान मंगेश साबळे आणि सहकाऱ्यांच्या या भूमिके नंतर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.