TRENDING:

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा इशारा, 'कुणाचा बाप आला तरी...'

Last Updated:

दरम्यान जरांगे हे परभणी आणि मस्साजोग येथील कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनतेनं 28 डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा काढला आहे..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Manoj Jarane Reaction on Santosh Deshmukh Case : जालना : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र पेटला आहे. या प्रकरणात अत्यंत क्रुरपद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आता देशमुख यांच्या कुटुंबियांकडून आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी होतेय. अशात या प्रकरणावरून अनेक नेतेमंडळी देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत.आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील देशमुख कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहे. तत्पुर्वी या हत्येवरून मनोज जरांगे चांगलेच भडकले आहेत.
manoj jarage patil
manoj jarage patil
advertisement

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना कुणाचाही बाप येवू द्या, मस्साजोग प्रकरण दाबू देणार नाही अशा इशारा संतोष देशमुख प्रकरणावरून त्यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कुणालाही सोडणार नाही. मग तपासाला इतका वेळ का लागतोय? पण जर एकदा का बीडच्या जनतेनं तपास हाती घेतला तर सरकारला कळेल असा इशाराही जरांगे यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.

advertisement

दरम्यान जरांगे हे परभणी आणि मस्साजोग येथील कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनतेनं 28 डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा काढला आहे.. त्याचबरोबर कोणताही जहांगिरदार आला तरी हे प्रकरण दबू देणार नाही आणि मी हटणारही नाही,असे जरांगे यांनी स्पष्ट सांगितले आहे.

सुरेश धस काय म्हणाले? 

भाजप आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर मिळाला आहे. यामुळे सीआयडी तपास करण्याची संधी मिळणार आहे. रात्रीच या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या एसआटीवर मुख्यमंत्र्यांची सही झाली आहे,अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. आयजीच्या मार्गदर्शानाखाली या घटनेचा सखोल तपास होणार असून न्यायालयीन तपासही होणार आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण मनावर घेतले असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

दरम्यान संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत खोटं निवेदन दिल्याचा आरोप होतोय.यावर बोलताना धस म्हणाले, मुख्यमंत्र्यांसारखे अतिशय सकारात्मक निवेदन कुणी केले नाही. एका दिवसात एसपी हलवला, गुन्हेगारांवर मोकोका लावणार असे सांगितले आहे. कायदा नावाची काही गोष्ट बीड जिल्ह्यात राहिली नाही. जी लोकं बीड जिल्ह्याचे पालक स्वतःला म्हणून घेत होती ते गँग ऑफ वासेपूरला बळ देत होती, अशी बोचरी टीका धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा इशारा, 'कुणाचा बाप आला तरी...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल