गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. विविध आंदोलनांदरम्यान नेतेमंडळींवर टीका होत असताना गोविंद फड यांच्या पोस्टने मोछी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना उद्देशून भाष्य केल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. काही जणांनी या पोस्टला खुले आव्हान म्हणून पाहिले असून, राजकीय दबावाखाली अशी भाषा वापरणे चुकीचे असल्याची टीका केली जात आहे. तर दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फड यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यात येत आहे.
advertisement
गोविंद फड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मात्र...
या वादग्रस्त पोस्टबाबत गोविंद फड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नेमकी ही पोस्ट कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आली, याबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे.
वाल्मिकच्या लेकाची पोस्ट व्हायरल
तर दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या मुलाची सुशील कराडची एक सोशल मीडियावरची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार असं त्याने म्हटलं आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे. सुशील कराड नेमकं काय बोलणार? काही मोठा खुलासा करणार का? असे अनेक प्रश्न या पोस्टमुळे उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे रडारवर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावपर सातत्याने आरोप केले जात होते. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस हे आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोपही केली. लतर संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीका केली होती. संतोष देशमुख प्रकरणामागचा खरा सुत्रधार वाल्मिक कराड असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा पाठीराखा असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
