मनोज जरांगे पाटील एबीपी माझाशी बोलताना हा दावा केला आहे. खरं तर महायुतीकडून मंत्रिपद नाकारल्यानंतर जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळाल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली होती. यावर बोलताना जरांगे म्हणाले, मंत्रिपद मिळण्याचा तो राजकीय विषय आहे. मला त्यात पडायचं नाहीये. त्याला मंत्रिपद द्यायचं की नाही तो सरकारचा विषय आहे, असे जरांगे यांनी सुरूवातीला सांगितले. तो स्वत:च बरळत राहतो मी ओबीसीचा नेता आहे. आणि ओबीसी नाराज झाला.ओबीसी काही नाराज होत नाही. तु ओबीसीच्या जीवावर किती खातो? तुला काही दिलं नाही म्हणजे ओबीसीला काही दिलं नाही, तुला दिलं की ओबीसीला दिलं काय बोलतो. वय काय आपलं, किती ज्येष्ठ आहे, सगळ्या जाती धर्माला धरून राहिलं पाहिजे जातीवाद केला नाही पाहिजे., मंत्री झाला की एका जातीच काम केलं पाहिजे, असा हल्ला देखील जरांगेंनी भुजबळांवर चढवला.
advertisement
छगन भुजबळाने शिवसेना मोडली, शरद पवारांची राष्ट्रवादी मोडली,अजित पवारांची राष्ट्रवादी ही मोडणार आहे. आणि भाजपसहित सगळ्यांना मोडणार आहे, असं मोठं विधान देखील जरांगे पाटलांनी केले आहे.तसेच भुजबळ पक्षात राहतील की नाही? असा सवाल करताच भुजबळ म्हणाले, राहिल पक्षात तो नाहीतर कुठे जाईल. नाहितर मध्ये (जेलमध्ये) टाकून देतील, जा म्हणतील भाकंर खायाला,लय अडवणूक केली कर त्याला मध्येच (जेलमध्ये) टाकतील. तसेच छगन भुजबळ अन्याय झाला म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या अंगावरती ओबीसी घालणार, मग फडणवीस साहेब त्याला मध्ये (जेलमध्ये ) फेकून देणार आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
सरकारला 25 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारला 25 जानेवारी पर्यंतची वेळ दिली आहे.या तारखेच्या आता आमच्या मागण्या करा नाहीतर सरकारला पश्चाताप होईल, असा इशारा देखील जरांगेंनी देवेंद्र फडणवीस सरकारला दिला आहे. मराठ्यांनी 25 जानेवारीला अंतरावली सराटीमध्ये यावं. ज्यांना उपोषण करायचे नसेल त्यांनीही यावे आणि पाठिंबा दाखवावा. तसेच आता हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यावे. यासाठी गावागावात बैठका घ्या, पत्रिका छापा आणि लोकांमध्ये वाटा. अशाप्रकारे अंतरवाली मधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठ्यांना निमंत्रण द्या. आणि 25 जानेवारीला कुठलेही कार्यक्रम ठेऊ नका, लग्नाची तारीख काढू नका,असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे.
