TRENDING:

Walmik Karad : 'ती विदेशी संपत्ती कराडची नाहीच, सरकारमधील बड्या नेत्याची', जरांगेंचा रोख नेमका कुणावर?

Last Updated:

अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांनी न्याय मिळावा म्हणून निघालेल्या लॉंग मार्चला मराठा समाजाचे पूर्ण समर्थन आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Manoj Jarange on Walmik Karad : सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी जालना : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध करत न्याय मागण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाआधी मनोज जरांगे पाटलांनी मोठं विधान केलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांनी न्याय मिळावा म्हणून निघालेल्या लॉंग मार्चला मराठा समाजाचे पूर्ण समर्थन असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. तसेच ती विदेशी संपत्ती वाल्मिक कराड नाहीच.सरकार मधील मोठ्या शक्तीचा यामागे हात असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. त्यामुळे जरांगेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
manoj jarange
manoj jarange
advertisement

अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांनी न्याय मिळावा म्हणून निघालेल्या लॉंग मार्चला मराठा समाजाचे पूर्ण समर्थन आहे.परभणी ते मुंबई मार्गावर मराठा समाजाने पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच लॉंग मार्च मध्ये आपण सहभागी होणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे.

advertisement

वाल्मिक कराडच्या राज्यातील आणि विदेशातील संपत्तीचा आता उलगडा होतोय. यावर बोलताना जरांगे म्हणाले, वाल्मिक कराड यांच्या विदेशी संपत्ती आणि विदेशी सीमकार्ड ऐकून मला धक्का बसला आहे.वाल्मिक कराड यांच्या आवाक्या बाहेरचे हे काम आहे.विदेशातील वाल्मिक कराड यांची संपत्ती त्यांची नाही.एवढी त्यांची ऐपत नाही.ही संपत्ती दुसऱ्या कुणाची तरी आहे,सरकार मधील मोठ्या शक्तीचा यामागे हात असल्याचे म्हणत जरांगेंनी नाव न घेता मुंडेंवर निशाणा साधला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

सरकार सध्या सत्ता मिळाल्याच्या आनंदात आहे. म्हणून त्यांना अजून संपर्क करायला वेळ मिळालेला नाही.25 तारखेचे आंदोलन शेवटचा हातोडा आहे.सरकारने मराठ्यांकडे दुर्लक्ष केले तर त्यांना ते महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : 'ती विदेशी संपत्ती कराडची नाहीच, सरकारमधील बड्या नेत्याची', जरांगेंचा रोख नेमका कुणावर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल