मनोज जरांगे म्हणाले, लोकसभेला जे सांगितले तेच विधानसभेला ही सांगितले ज्याला निवडायचं त्याला निवडा ज्याला पाडायच त्याला पाडा. राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे. एका समाजावर राजकरण करणे शक्य नाही स्वतःची लेकरं अधिकारी झाली मला हा टक्का वाढवायचा आहे, त्यासाठी हा लढा आहे. त्यामुळे कोणी पैसे घेऊ नका आणि दिलेत तर घ्या त्याच्या एकट्या बापाचे नाही.
advertisement
जीवाचं काही होऊ दे पण आरक्षणाची लढाई थांबणार नाही : मनोज जरांगे
शेतकऱ्यांनी मतदानाला जाताना शेतीमालाला भाव आहे का? कर्जमुक्ती केली का? ते आठवून मतदान करा.दलित आणि मराठा यांनी देखील मतदान योग्य व्यक्तीला करा कारण त्याची गरज निर्माण झाली आहे. सतत उपोषण करुन आता माझे शरीर साथ देत नाही, सारख्या सलाईन लावाव्या लागतात. माझ्या जीवाचं काही होऊ दे पण आरक्षणाची लढाई थांबवायची नाही, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.
मराठे कुणाचंही सरकार पाडू शकतात : मनोज जरांगे
शेतीमालाला योग्य भाव हवा त्याशिवाय मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये. राज्यात आता कुठेच उपोषण करायच नाही फक्त तारीख सांगेल त्यावेळी अंतरवली सराटीला या. सरकार कोणाचे पण येऊ दे, सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवतो. मराठे कुणाचंही सरकार पाडू शकतात असे जरांगे म्हणताच सभेत घोषणाबाजी झाली. त्यानंतर आता तुम्ही ठरवलंय आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडणार हे नक्की दिसतय, असे जरांगे म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय त्यात येवला येथे आलो त्यात काही विशेष नाही, गाव आहे त्यांना टाळू शकत नाही. लोकसभेला देखील सांगितले होते पाडा तर पाडा. येवला महाराष्ट्राच्या बाहेर नाही, एकदा लोकांनी ठरवले तर ठरवले आहे परिवर्तन होणार असे देखील जरांगे म्हणाले.
