संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत. या मोर्चाआधी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या आरोपींनी सांभाळू नये, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे. तसेच यांना सोबत ठेवू नका मध्ये टाका. आरोपीला पाठिशी घालायचं काम मुख्यमंत्री करतायत. आरोपींना सत्ताधाऱ्यांनीच लपून ठेवलं आहे,असा आरोप जरांगेंनी फडणवीसांवर केला आहे.
advertisement
संतोष देशमुख यांच्या घरचे सगळे रडत आहेत, याचं राजकारण केलं जात आहे. त्यामुळे आधी विरोधी आणि सत्ताधारी असा भेद करणं बंद करा. संतोष भैय्यांचा खून झाला आहे, याच्यात कुणीही राजकारण करू नका. सरकारने आरोपींचा शोध लावायला पाहिजे, याच्यात हलगर्जीपणा करू नये. जातीयवाद पसरवेल असं काही करू नये, असे देखील जरांगे यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या झाली असल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, इतर आरोपींचा खून झाला की नाही, हे मला माहीत नाही. पण असं असेल तर शंभर टक्के या प्रकरणात मोठे लोक असतील, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे. इतर आरोपींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिशी घालत आहेत, सत्ताधाऱ्यांनीच आरोपींना लपवून ठेवलं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला.
