तुम्हाला राग असेल तर गोळी घाला, मारून टाका असे सोमनाथ सुर्यवंशी यांचा भाऊ मनोज जरांगेंसमोर सांगत होता.सोमनाथ आईला देखील यावेळी जरांगेंसमोर अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्या म्हणाला, सोमनाथची सर्व बोटं तुटून गेली होती. पाठिवर देखील त्याला मारण्यात आलं होतं. माझ्या मुलाला हाल हाल करून मारलं,असं त्यांनी जरांगेंसमोर सांगितलं.
जर त्याला श्वसनाचा त्रास असेल, ज्याला हृदयविकाराचा त्रास असेल तर तो 35 वर्ष कसा जगला असेल. आणि जर तो मेला असता तर रूमवर मेला असता, बाहेर मेला असता जेलमध्ये कसा मेला असता? असा सवाल सोमनाथच्या भावाने उपस्थित केला आहे.
advertisement
माझ्या मुलाचा परभणीला एलएलबीला नंबर लागलाय. मला म्हणाला मम्मी माझा नंबर लागलाय. कसं करू? मी म्हटलं लागलाय नंबर तर घे अॅडमिशन. संभाजीनगरला पीएचडीमध्ये नंबर लागला. हे पेपर झाल्या झाल्या माझा मुलगा तिकडे जाणार होता. स्टेशनवर माझा मुलगा पोलिसांच्या पाया पडला, सर मला सोडा,माझे पेपर जवळ आले आहेत, सोडा साहेब पण त्यांनी सोडलं, असं सोमनाथच्या आईने सांगितले.
आम्हाला शेत नाही गावात घर नाही मला,कुडाचं घर आहे, कुत्रे मांजरे जातात असे सोमनाथच्या आईने सांगितले.तसेच इतका अन्याय कुणावर होऊ नये, कोणत्याही जातीच्या मुलावर इतका अन्याय होऊ नये, असे सोमनाथचा भाऊ जरांगेंना सांगतो.
परभणीमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे.पोस्टमार्टम रिपोर्ट वेगळा आणि मुख्यमंत्री मात्र वेगळे कारण कसे काय सांगतात.जात पात विसरून सगळ्यांनी न्यायासाठी एकत्र यावे लागेल.सोमनाथ यांना न्याय मिळेपर्यंत मराठा त्यांच्या पाठीशी राहील ही ग्वाही देतो अशी भावना मनोज जरांगे पाटील यांनी सोमनाथ यांच्या कुटुंबियांना भेटीनंतर व्यक्त केली आहे.
