किती आणि कोणत्या जागा लढायच्या तसेच कोणते उमेदवार रिंगणात उतरवायचे, याची घोषणा मनोज जरांगे पाटील ३ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. आता पिचलेल्या समाजाने गुलामगिरी झुगारून लावायची वेळ आली आहे. वंचित समाज राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढलाय. माझा मराठा समाज एकजूट होत नव्हता, तो मी करून दाखवला, या कामात मी यशस्वी झालो, आता मराठ्यांनी यापुढे आझाद म्हणून जगावे, असे जरांगे म्हणाले.
advertisement
दलित मुस्लीम साथीला आहेत. मराठा एकगठ्ठा आहेत. मागास जातीतील लोकही येऊन भेटत आहेत. त्यामुळे आपल्या समीकरणांनुसार सगळं काही व्यवस्थित झालं तर जागा पडणार नाहीत, असे सांगत ज्यांनी आमच्या आई बहिणींवर लाठी हल्ला केला त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांचा सुपडा साफ करणारच असे इशारा जरांगे यांनी दिला.
माझी मान कापली तरी मी मागे हटणार नाही. १५०० रुपये देऊन तुम्ही आम्हाला नादी लावता का? आपली लढाई आपल्या लेकरांवर अन्याय होऊ द्यायची नाही यासाठी आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
चार तारखेला मी सांगितल्यानंतर संबंधितांनी लगोलग अर्ज मागे घ्यावेत. मी सांगितलेला अर्जच फक्त राहिल, बाकीचे अर्ज लगोलग मागे घ्यायचे. बाकीच्या लोकांनी स्टार प्रचारक म्हणून मी सांगितलेल्या उमेदवाराचे काम करायचे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मनोज जरांगे पाटील गेली आठवडा विविध जाती धर्माच्या प्रमुख लोकांशी चर्चा करीत आहे. राज्यातील विविध मतदारसंघातील समीकरणे लक्षात घेऊन त्यानुसार गणितांची आखणी करीत आहेत. किती, कोणते आणि कुठे उमेदवार द्यायचे, यासंबंधीचा निर्णय ते लवकरच जाहीर करणार आहेत.
