राजरत्न आंबेडकर यांनी जरांगेंचा दावा खोडून काढत, आपण करत जरांगे यांना उमेदवारांची यादी आधीच दिल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी या विषयावर प्रश्न विचारला असता, राजरत्नचा विषय संपलेला असे म्हणत बोलण टाळलं आहे.
राज ठाकरेंना ठणकावलं
उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं होतं असं जाहीर भाषणात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय. आमचा वर्ग तुम्हाला मानणारा आहे. मात्र तुम्ही आरक्षणावर काही बोलू नये. समाजाचं अस्तित्व आणि आरक्षण कसं मिळवायचं ते मी पाहतो. तुमच्यासारखं अस्तित्व गमावून बसणारा मी नाही. त्यामुळं तुम्ही या भानगडीत पडू नका असा इशारा जरांगे यांनी दिला आहे..
advertisement
विधानसभा निवडणुकीत मराठा समाज योग्य भूमिका घेईल असं सांगत येणाऱ्या १० तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगे यांनी म्हंटलं आहे. शिवाय शेवटच्या दोन दिवसातही मराठा समाज कार्यक्रम लावू शकतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
