यावेळी मनोज जरांगे यांनी अजित पवारांना किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा दिला आहे. जरांगे यांच्याकडून काल पोलीस अधीक्षकांना सुरक्षा काढून घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे आज त्यांच्यासोबत एकही अंगरक्षक नाही. तुम्ही धनंजय मुंडेला चौकशीसाठी बोलावत नाही, आता तुम्हाला नाकीनऊ आणणार, अशा शब्दांत जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अजित पवारांना थेट इशारा दिला आहे.
advertisement
मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
घातपात प्रकरणात धनंजय मुंडे यांना पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जात नसल्याने मनोज जरांगे कमालीचे संतापले आहेत. मुंडे यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वाचवत असून आता तुमच्या नाकीनऊ आणतो. धनंजय मुंडेला वाचवण्याची किंमत फडणवीस, अजित पवारांना मोजावी लागणार असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे.
तुम्हाला हा (धनंजय मुंडे) एकटा हवा की कोट्यावधी मराठे हवेत, हे ठरवा असंही मनोज जरांगे म्हणाले. या महापाप्याला वाचवून हे पाप कुठे फेडणार? न्याय करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आता मला मारण्यासाठी कोण कोण येतो? ते बघतो असं थेट आव्हान जरांगे यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे
