TRENDING:

जूनमध्ये नवरा मारला गेला, १ कोटींचं बक्षीस असलेल्या स्मृतीचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना हादरा

Last Updated:

Maoists Smriti Surrender: महिला माओवादी नेता स्मृतीने तिच्या सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने माओवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महेश तिवारी, प्रतिनिधी, गडचिरोली : दंडकारण्याच्या जंगलात गेली ४० वर्ष बंदूक हातात घेऊन फिरणाऱ्या वरिष्ठ महिला माओवादी नेता स्मृतीने तिच्या सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने माओवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. स्मृती पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली उच्चशिक्षित असून जूनमध्ये चकमकीत ठार झालेला माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीचे सदस्य सुधाकरची पत्नी आहे.
माओवादी नेता स्मृतीचे आत्मसमर्पण
माओवादी नेता स्मृतीचे आत्मसमर्पण
advertisement

पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर १९८५ मध्ये आंध्र प्रदेशात माओवाद्यांच्या संघटनेत दाखल झालेल्या स्मृतीने अनेक घटनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला असून माओवाद्यांच्या राजकीय विचारधारेचे शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये ती सक्रीय होती.

माओवाद्यांच्या संघटनेत विविध पदांवर काम केलेल्या स्मृतीचे वडील तेलगू चित्रपटसृष्टीत अभिनेता होते. क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या स्मृतीची लहान बहीण माधवी ही माओवादी असून ती जंगलात सक्रीय आहे. गेल्या जून महिन्यात स्मृतीच्या पतीला चकमकीत पोलिसांनी ठार मारल्यानंतर स्मृती हादरली. स्मृतीवर पाच राज्यात मिळून एक कोटी रुपयांचे बक्षीस असून तिच्यासोबत माओवाद्यांच्या संघटनेत सक्रीय असलेल्या हरीश या माओवाद्याने आज आत्मसमर्पण केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जूनमध्ये नवरा मारला गेला, १ कोटींचं बक्षीस असलेल्या स्मृतीचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना हादरा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल