डॉ. संजय लाखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले की, जरांगे हे संपूर्ण मराठा समाजाचे नव्हे तर केवळ कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या एकाही मागण्या कायदेशीर किंवा घटनात्मक स्वरूपाच्या नसल्याचे त्यांनी म्हटले. “समाजाने कोट्यवधी रुपये आंदोलनावर खर्च केले, पण चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून समाजाचेच नुकसान झाल्याचा दावा लाखे यांनी केला.
advertisement
जरांगेंना आधीच ड्राफ्ट माहीत होता...
मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “आधीच ड्राफ्ट तयार करून नंतर अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचे नाटक करण्यात आले. गुलाल उधळून सरकारचा जयजयकार केला गेला, ही समाजाची फसवणूक आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
संघाच्या अजेंड्यानुसार काम...
आरएसएस अजेंड्याचा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटले की, जरांगेंचे आंदोलन थांबले तर त्यांना पाठिंबा मिळणार नाही. “RSS च्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं करण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. जरांगे यांच्या या मागण्या घटनात्मक व कायदेशीर कसोटीवर टिकाव धरण्यासारख्या नाहीत,” असा दावा त्यांनी केला. डॉ. लाखे पाटील यांच्या या टीकेमुळे मराठा आरक्षण चळवळीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.