पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावात ही घटना घडली आहे. हर्षाली राहुल अहिरे (वय वर्ष 28), लहान मुलगा संकेत राहुल आहेर (वय 5) आणि मुलगी आरोही राहुल अहिरे (वय 7) असं मृत तिघांची नावं आहे. राहत्या घराजवळ असलेल्या विहिरीतच तिघांचे मृतदेह आढळून आले. मयत महिलेने सततच्या सासरच्या होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे.
advertisement
या आधी देखील सदर मयत महिला हर्षाली हिला तिचा पती राहुल आणि तिच्या सासरच्यांकडून पैशांसाठी छळ होत असल्याने तिने महिला समुदेशन केंद्र इथं तक्रार केली होती. त्यावेळी हर्षाली आणि सासरच्या लोकांची समजूत काढण्यात आली होती. त्यामुळे संसार आणि आपल्या दोन मुलांकडे बघत हर्षली ही पुन्हा सासरी नांदायला गेली होती. पण अचानक आज तिघांचे मृतदेह विहिरीत आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. हर्षालीने आत्महत्या केली नाही, हा घात झाल्याचे तिचे वडील धर्मा देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत हर्षालीचा पती, सासू, सासरा आणि नणंद या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
