मक्याचे दर स्थिर
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 28 हजार 484 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 6 हजार 117 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1550 ते जास्तीत जास्त 2136 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 414 क्विंटल मक्यास 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मक्याला मंगळवारी मिळालेला सर्वाधिक दर आजही स्थिर आहे.
advertisement
कांद्याच्या दरात लक्षणीय घट
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 58 हजार 815 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 53 हजार 775 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 100 ते 2700 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 339 क्विंटल कांद्यास 1300 ते 2800 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत कांद्याच्या दरात आज घसरण झालेली दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण
राज्याच्या मार्केटमध्ये 49 हजार, 594 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 10 हजार 457 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4135 ते 4794 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 हजार 329 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4053 ते 5660 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोयाबीनच्या दरात आज काहीशी घसरण झालेली दिसून येत आहे.





