Weather Alert : आता वारं बदलणार! महाराष्ट्राच्या दिशेनं नवं संकट, सगळीकडे जाणवणार; हवामान खात्याकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
निफाड येथे 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढलेला आहे. 25 डिसेंबर रोजीही राज्यातील तापमानात घट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील तापमानात सतत चढ-उतार सुरू असले तरी थंडीला पोषक वातावरण कायम असल्याने थंडीचा कडाका राज्यभर जाणवत आहे. विशेषतः सकाळच्या वेळी हवेतील गारवा अधिक तीव्र असून अनेक भागांत धुक्याची स्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागानुसार पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. निफाड येथे 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढलेला आहे. 25 डिसेंबर रोजीही राज्यातील तापमानात घट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाहुयात 25 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहणार आहे.
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कायम आहे. पुणे शहरात 25 डिसेंबर रोजी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. पुण्यात सकाळच्या वेळी धुक्याची स्थिती राहणार असून त्यामुळे नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागणार आहे. परिसरातील इतर शहरांमध्येही थंडीमुळे हुडहुडी कायम आहे.
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. नाशिकमध्ये 25 डिसेंबर रोजी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. परिसरात निरभ्र आकाश असले तरी सकाळच्या वेळी गारठा जाणवेल. अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले असून जळगावमध्येही तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले गेले आहे.
advertisement
advertisement









