TRENDING:

Satara: रस्ता हरवला धुरात, 50 फूट उंच धुराचे लोट, साताऱ्यातील आगीचा भीषण VIDEO

Last Updated:

सातारा शहराजवळील सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सातारा: साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील सोनगाव कचरा डेपोला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा अडथळा झाला. रस्त्यावर दिसेना झालं अशी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्याा माहितीनुसार, सातारा शहराजवळील सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे प्रचंड लोट आणि दाट धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आगीच्या ज्वाळा जमिनीपासून तब्बल ५० फूट उंच उसळत असल्याचे पाहायला मिळाले, तर धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरल्यामुळे काही काळ संपूर्ण परिसर अंधकारमय झाल्याची स्थिती होती.

advertisement

[video width="854" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/satara-2026-03-41d91c7e8549b008bf498c2f7a699f2c.mp4"][/video]

घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत.

मात्र, कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी या परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

advertisement

नालासोपाऱ्यात प्लास्टिक कंपनीला आग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 बहिणी बनल्या बॉस, नोकरी अन् शिक्षण सांभाळत करतात मोमोज व्यवसाय, इतकी कमाई
सर्व पहा

दरम्यान, मुंबईजवळील नालासोपारा पूर्व येथील सोपारा फाटा परिसरातील चॅम्पियन कंपाउंडमधील एका प्लास्टिक कंपनीला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने काही प्रमाणात वेग घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: रस्ता हरवला धुरात, 50 फूट उंच धुराचे लोट, साताऱ्यातील आगीचा भीषण VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल