बराच वेळ घराचा दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांनी संशयावरून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तात्काळ सर्वांना जवळच्या टेंभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कुटुंबात रमेश मौर्या, त्यांची पत्नी नीलम, मुली चाहत आणि अनामिका, तीन वर्षांची मुलगी दिपाली आणि चुलत भाऊ राजकुमार मौर्या यांचा समावेश आहे.
advertisement
दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्याआधीच तीन वर्षांच्या दिपालीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रमेश, नीलम, चाहत, अनामिका आणि राजकुमार यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. भाईंदर पोलीस ठाण्याचे अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी सांगितले की, "या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत." या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिली नवीन अपडेट
मीरा भाईंदर मधील जय बजरंग नगर येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. चाहत मोर्या आणि अनामिका मोर्या यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे हलवण्यात आले आहे. विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास मीरा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत.