मागील अनेक वर्षांपासून भोकरदनमध्ये दानवे कुटुंबाचं वर्चस्व आहे. मात्र यंदा शरद पवारांनी दानवे पिता पुत्रांना चकवा दिला आहे. भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मिर्झा समरीन विजयी झाल्या झाल्या आहेत. त्यांनी 830 मातांनी बाजी मारली आहे. मिर्झा यांनी भाजपाच्या आशा माळी यांचा पराभव केला आहे.
सुरुवातीच्या काही कलांमध्ये भोकरदनमध्ये आशा माळी आघाडीवर होत्या. इथं दानवे पिता पुत्रांचं वर्चस्व पाहता आशा माळी सहजपणे जिंकतील असं बोललं जात होतं. मात्र अंतिम निकालात मिर्झा समरीन दानवे पिता पुत्रांना चकवा देण्यात यशस्वी झाल्या आहेत. भोकरदनमध्ये आतापर्यंत भाजपाचे 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 9 आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा रावसाहेब दानवे यांना सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
राष्ट्रवादीच्या समरीन मीर्झा विजयी होताच, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मिरवणूक काढली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवेंनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर जोरदार जल्लोष साजरा केला. भल्याभल्यांना चकवा देणारं व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानवेंना होम पीचवर धक्का बसल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे.
जालना जिल्ह्यात नगराध्यक्ष कुणाचा?
जालना : एकूण जागा 3
राष्ट्रवादी SP - 01
भाजप - 02
भोकरदन: -राष्ट्रवादी SP मिरझा समरीन विजयी.
भाजपच्या आशा माळी पिछाडीवर...
परतूर :- भाजपच्या प्रियंका राक्षे आघाडीवर...
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे पिछाडीवर..
अंबड : भाजपच्या देवयानी कुलकर्णी आघाडीवर...
महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या श्रद्धा चांगले पिछाडीवर
