ठाणे महानगर पालिकेत भाजप-शिंदेसेनेसमोर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे आव्हान आहे. सेना-मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
त्यांना १५ कोटींची ऑफर्स दिली गेली, राज ठाकरेंनी माणसं समोर आणली
आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या, पण यावेळची निवडणूक वेगळी आहे. सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा पाऊस पाडला जातोय. भाजपचे लोक पैसे वाटतायेत, शिंदेंचे लोक पैसे वाटतायेत. लोकांना मतदानासाठी पैसे वाटले जातायेत. उमेदवारांना देखील निवडणूक न लढविण्यासाठी कोटीच्या कोटी ऑफर्स दिल्या जातायेत. मी फक्त दोन तीन नाव घेतो. शैलेश धात्रक, मनिषा धात्रक, पुजा धात्रक, प्रभागात ४ जण उभे होते. किती पैशांची ऑफर्स दिली असेल? तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. या तीन लोकांना एका घरात १५ कोटींची ऑफर दिली होती. मला त्यांना इकडे बोलायचे होते. त्यांनी पैसे नाकारून निवडणुकीला उभे राहिले आहे. १५ कोटींची ऑफर्स त्यांनी धुडकावली.
advertisement
सुशील आवटे यांना एक कोटीची ऑफर झाली होती. मंचावर असलेल्या महिलेला ५ कोटींची ऑफर दिली होती. आले कुठून पैसे, टांकसाळ उघडली की काय? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. या लोकांना काही लगामच नाहीये. जे काही हवंय ते बिनधास्त यांना करायचंय, कोणत्याच यंत्रणांकडे याचे उत्तर नाहीये, असे राज ठाकरे म्हणाले.
