TRENDING:

Morning Digest : 15 जुलैपासून संकटांची मालिका, 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट तर राज्यात आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम

Last Updated:

Morning Digest: जुलै महिन्यात पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट आहे. महाराष्ट्रात शक्तिपीठ आणि समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Morning Digest : जुलै महिना अर्धा संपत आला तरी अजूनही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस काही आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. दुसरीकडे शक्तिपीठ, समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचं आज महाराष्ट्रात आंदोलन असणार आहे. या महत्त्वाच्या बातम्यांआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आजचा दिवस कसा जाणार, तुम्हाला आज खुशखबर मिळणार की अडचणींचा सामना करावा लागणार ते आधी जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

Horoscope Today: या राशीचे लोक आता योग्य ट्रॅकवर, प्रगती चौफेर

12 राशींपैकी कोणत्या राशींना आज खुशखबर मिळणार? मिथुन, मेष, धनु, कन्या राशींसाठी आजचा दिवस संकटांचा असेल की आनंद घेऊन येईल, तुमचा दिवस आजचा कसा जाईल हे ज्योतिषतज्ज्ञ चिराग दारुवाला यांनी सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

advertisement

आजचा दिवस कसा जाणार हे समजलं, मात्र 15 जुलैपासून राहू, चंद्र आणि शनि या तीन ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींच्या मागे साडेसाती लागण्याची शक्यता आहे. यात तुमची रास तर नाही ना?

15 ते 17 जुलैचा काळ 5 राशींसाठी ठरणार वाईट!

ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या काही दिवसांत चंद्र, राहू आणि शनि यांच्यातील ग्रह संयोगामुळे दोन मोठे अशुभ योग तयार होणार आहेत. ग्रहण योग आणि विष योग. यामुळे पाच राशींना विशेष प्रभाव जाणवणार असून, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

advertisement

शनिने वक्री (उलटी) हालचाल सुरू केली असून त्याच दिवशी संध्याकाळी चंद्र आणि राहूची युती होऊन ग्रहण योग तयार होणार आहे. यानंतर, 15 जुलै रोजी चंद्र आणि शनीची युती होऊन विष योग तयार होईल, जो 17 जुलैपर्यंत प्रभावी राहील. हे दोन्ही योग काही राशींमध्ये अडथळे, मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधांमध्ये विसंवाद निर्माण करू शकतात.

advertisement

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आजचा दिवस कसा जाईल, कोणत्या राशींच्या मागे साडेसाती लागेल हे पाहिलं, मात्र आज घराबाहेर पडताना वातावरण कसं असेल? तुमच्या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने कोणत्या अलर्ट दिला आहे ते पाहूनच घराबाहेर पडा, नाहीतर पावसा, पाण्यात वाटेत अडकण्याची भीती आहे.

वारं फिरलं! धो धो कोसळणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट

advertisement

राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही काळात कोकणसह विदर्भात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. तर मागील 3-4 दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरला होता. पुढील 24 तासांत राज्यातील 12 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राशीभविष्य आणि हवामान पाहिलं, पण दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात काय घडणार याचे अपडेट्स मिळाले तर मग कोणत्या शेअर्समध्ये पैसे लावायचे, की आज थोडं थांबायचं हे ठरवतं येईल, त्यामुळे आजच्या शेअर मार्केटचा कल कसा असेल ते सोप्या भाषेत समजून घेऊया.

शेअर बाजारात ‘शॉक वेव’ येणार

Nifty50 Option Trades: निफ्टी50 ऑप्शन ट्रेड्समध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यामुळे शेअर बाजारात खळबळ माजली आहे. एक्सपायरीच्या दिवशी स्ट्रॅडल ऑप्शन्सच्या किमतीत अचानक झालेल्या उसळीमुळे SEBIने चौकशी सुरू केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

राज्यात आज काय काय महत्त्वाचं घडणार आहे ते जाणून घेऊया.

शक्तिपीठासाठी शेतकरी उतरणार रस्त्यावर

कोल्हापुरातील गडहिंग्लज शहरात शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकरी आता रस्त्यावर उतरून ताकद दाखवणार आहेत. एका बाजूला तीव्र विरोध असताना समर्थक शेतकरी आज भव्य पदयात्रा काढणार आहेत.आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा होणार. हातात सातबारा उतारे घेऊन शेतकरी आणि नागरिक शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी पदयात्रेत सहभागी होणार. त्याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्यांचं आज आंदोलन

नांदेड समृद्धी बाधित शेतकरी आज तळ्यात जलसमाधी आंदोलन करणार आहेत. शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित राहणार असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असणार आहे.

जळगाव- शासनाने मद्यावरील कर वाढवल्याने व्यवसायात २५ टक्क्यांची घट होऊ शकते. या विरोधात जिल्ह्यातील मद्य व्यावसायिक, बारचालकांनी १४ जुलै रोजी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या दिवशी सर्व मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

सांगली- अन्यायकारक आणि अन्याय पूर्ण करवाडीच्या विरोधात आज सांगली जिल्ह्यातील सर्व परमिट रूम आणि बियर बार चालकांचा एक दिवसीय बंद आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Morning Digest : 15 जुलैपासून संकटांची मालिका, 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट तर राज्यात आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल