advertisement

उद्या शेअर बाजारात ‘शॉक वेव’ येणार, Nifty50 मध्ये मोठी उलथापालथ शक्य; SEBIच्या हालचालींनी गुंतवणूकदारांत खळबळ

Last Updated:

Nifty50 Option Trades: निफ्टी50 ऑप्शन ट्रेड्समध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यामुळे शेअर बाजारात खळबळ माजली आहे. एक्सपायरीच्या दिवशी स्ट्रॅडल ऑप्शन्सच्या किमतीत अचानक झालेल्या उसळीमुळे SEBIने चौकशी सुरू केली आहे.

News18
News18
मुंबई: अलीकडील काळात निफ्टी50 इंडेक्सशी संबंधित ऑप्शन ट्रेड्समध्ये काही विचित्र हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. विशेषतः एक्सपायरीच्या दिवशी ‘स्ट्रॅडल’ (Straddle) ऑप्शन्सच्या किमती अचानक वाढत आहेत, जे सामान्यतः घडत नाही. या प्रकाराने मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)चं लक्ष वेधलं आहे.
स्ट्रॅडल म्हणजे काय?
स्ट्रॅडल ही एक ट्रेडिंग रणनीती आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदार एकाच वेळी निफ्टी वाढेल (Bullish) आणि घसरेल (Bearish) या दोन्ही गोष्टींवर पैज लावतो. सामान्यतः एक्सपायरीच्या दिवशी स्ट्रॅडलची किंमत हळूहळू कमी होते. मात्र गेल्या काही वर्षांत अनेक वेळा असं झालं आहे की- स्ट्रॅडलच्या किमती अचानक अनेकपटीने वाढल्या, जे समजण्यापलीकडचं आहे. त्यामुळे काही ट्रेडर्सचा संशय आहे की, मार्केटमध्ये एखादा मोठा खेळाडू मोठी चाल खेळत आहे.
advertisement
दिल्लीतील Algoquant ट्रेडिंग फर्मचे मॅनेजिंग डायरेक्टर देवांश गुप्ता यांनी सांगितलं की, अनेकदा स्ट्रॅडलच्या किमती एक्सपायरीच्या दिवशी कोणताही ठोस कारण नसतानाही वाढतात आणि अपेक्षेप्रमाणे कमी होण्याऐवजी स्थिर राहतात.
जेन स्ट्रीटवर इंडेक्स हेराफेरीचे आरोप
अलीकडेच सेबीने अमेरिकन फर्म Jane Street ग्रुपवर बंदी घातली आहे. कारण त्यांच्यावर इंडेक्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप आहे. सेबीच्या आदेशात ‘स्ट्रॅडल’चा थेट उल्लेख नसला, तरी "अनपेक्षित किंमतींतील चढ-उतार" यावर नोंद घेतली गेली आहे. Jane Street ने मात्र हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, ते केवळ एक सामान्य ट्रेडिंग रणनीती वापरत होते.
advertisement
निफ्टी आणि सेन्सेक्सवरही चौकशी
आता सेबीने निफ्टी आणि सेन्सेक्ससारख्या मोठ्या इंडेक्सवरही चौकशीचा फास आवळायला सुरुवात केली आहे. मे महिन्यात एक्सपायरी डेवर झालेले काही व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत आणि यावर अधिक सखोल चौकशी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
उद्या शेअर बाजारात ‘शॉक वेव’ येणार, Nifty50 मध्ये मोठी उलथापालथ शक्य; SEBIच्या हालचालींनी गुंतवणूकदारांत खळबळ
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement