TRENDING:

महाराष्ट्रातील सर्वात महागडा प्रवास, 50 मिनिटाच्या प्रवासासाठी मोजले तब्बल 43 हजार रुपये

Last Updated:

महागड्या तिकिटांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असली, तरी वेळेची बचत करण्यासाठी सधन वर्ग या दरांकडे दुर्लक्ष करून प्रवास करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेने अवघ्या काही महिन्यांतच मोठी झेप घेतली असली, तरी सध्या विमान तिकिटांच्या दरांनी गगनाला गवसणी घातली आहे. आगामी सलग सुट्ट्या, देवदर्शन आणि लग्नाचे मुहूर्त यामुळे सोलापूर विमानतळावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. मागणी प्रचंड वाढल्याने सोलापूर-मुंबई विमान प्रवासाचे तिकीट प्रथमच तब्बल 43 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे, इतके महागडे तिकीट असूनही विमानातील सर्वच्या सर्व जागा आगाऊ आरक्षित झाल्या आहेत.
News18
News18
advertisement

सोलापूर ते मुंबई या प्रवासासाठी सामान्यतः 3500 ते 5000 रुपये भाडे आकारले जाते. मात्र, 19 ते 22 मार्च दरम्यान सलग सुट्ट्या येत असल्याने प्रवाशांनी विमान प्रवासाला पसंती दिली आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत खाजगी विमान कंपन्यांच्या 'डायनॅमिक फेअर'मुळे हे दर 12 ते 18 पटीने वाढले आहेत. रविवारच्या फ्लाईटसाठी शेवटचे एक तिकीट तब्बल 43 हजारांना विकले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर सोलापूर-गोवा विमान प्रवासाचे दरही 18 हजार रुपयांच्या पार गेले आहेत.

advertisement

सर्व फ्लाईट्स 'हाऊसफुल्ल'

19 मार्च ते 22 मार्च या कालावधीत गुढीपाडवा, साप्ताहिक सुट्ट्या आणि पर्यटन यामुळे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर दर्शनासाठी येणारे भाविक आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी विमानाची सर्व 60 आसने आधीच बुक केली आहेत. महागड्या तिकिटांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असली, तरी वेळेची बचत करण्यासाठी सधन वर्ग या दरांकडे दुर्लक्ष करून प्रवास करत आहे.

advertisement

वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांची विमानाला पसंती 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

सध्या लग्नसराईचे मोठे मुहूर्त असल्याने अनेक कुटुंबे प्रवासासाठी विमानाचा आधार घेत आहेत. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नसल्याने आणि रस्ते मार्गांमुळे होणारा वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी विमानाला पसंती दिली आहे. मात्र, विमान तिकिटांच्या या लुटमारीवर नियंत्रण असावे, अशी मागणी आता सोलापूरच्या प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रातील सर्वात महागडा प्रवास, 50 मिनिटाच्या प्रवासासाठी मोजले तब्बल 43 हजार रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल