डॉ. स्तुती सोनवणे हिनं प्रियकर फैजुलला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक कडू-गोड आठवणी लिहिल्या आहेत. तू मला खूप अपमानित केलंय. तुझे कठोर शब्दच मला जीव देण्यासाठी पुरेसे आहेत. आता मी जीव दिल्यावर तुझा पुरुषी अहंकार सुखावेल. मला स्वत:वर हसून येतंय. मला अजूनही तुझ्यासोबत राहायचं होतं. तू माझ्यावर ओरडला. मी समोर असते, तर तू मला मारलंच असतं. किंवा खूप हिंसक झाला असता, असं स्तुतीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
advertisement
तू म्हणालास की तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल जे म्हटलं ते बरोबर होतं. तरुण मुली चांगल्या नसतात. आपण रिलेशनशिपमध्ये असताना तुझ्याकडे बंबल होतं. तरीही मी तुला माफ केलं. कदाचित माझ्यात स्वाभीमान नव्हता, असंही तरुणीने नोटमध्ये म्हटलं आहे. मी आणि फैजुल एक वर्षाहून अधिक काळ रिलेशनमध्ये होतो, असंही तिने चिठ्ठीत म्हटलं.
त्याच्या वाईट सवयींबद्दलही तरुणीने चिठ्ठीत सांगितलं आहे. त्याच्या अनेक वाईट सवयी होत्या. तो सिगरेट ओढायचा, दारु प्यायचा. तरीही मी सगळं सहन केलं. कदाचित मी मूर्ख होते, आता तर आणखी मूर्ख आहे. पण मी त्याच्या प्रेमात पडले, अशा शब्दात तिने आपल्या व्यथा मांडल्या आहेत. तिची ही नोट सध्या व्हायरल झाली असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
