TRENDING:

एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरासमोर येणार, बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता

Last Updated:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत शहरात आज होणारी जिल्हा नियोजन बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे-एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरे-एकनाथ शिंदे
advertisement

विरोधीपक्षातील आमदारांना निधी न मिळणं, सरकार दरबारी मंजूर कामे न होणे यावरून विरोधीपक्षातील आमदार जिल्हाधिकारी आणि मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर रोष व्यक्त करण्याची शक्यता आहे.

मुंबई शहरातील जिल्हानियोजन बैठक वादळी ठरण्याची शक्यता

शिवाय कोस्टलरोड परिसरात नव्याने हेलिपॅड निर्मिती, मुंबई शहर परिसरात बिहार भवनाला मिळालेली मंजूर यावरून सत्ताधारी पालकमंत्र्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.कफपरेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे बैठक सुरू आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जिल्हानियोजन बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

advertisement

एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे बैठकीच्या निमित्ताने समोरासमोर आले होते

गेल्या काही महिन्यांपू्र्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे एका बैठकीच्या निमित्ताने आमनेसामने आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा एक फोटो समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाला होता. आदित्य ठाकरे भेदक नजरेने डोळ्यात डोळे घालून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहत असल्याचा फोटो समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला होता.

advertisement

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकांना फाटा, तरुणाने केली फळाची शेती, कमाईही दमदार Video
सर्व पहा

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची दांडी मारल्याने आमदार आणि मंत्री संतापले होते. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून लोकप्रतिनिधींनी जाब विचारला. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल आणि वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त गैरहजर होते. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दरेकर आणि सुनील प्रभू संतापले. आम्ही काय खुर्चीवर बसून फक्त चहा प्यायला आलो आहे की काय? अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरासमोर येणार, बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल