TRENDING:

दाट धुकं पडलं, रस्ताच दिसला नाही अन् अनर्थ घडला; चार वाहनांच्या विचित्र अपघातात चौघांचा...मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Last Updated:

एसटी बस, कंटेनर, कार आणि दुचाकी या अशा चार वाहनांनी एकमेकांना भीषण धडक दिली.या धडकेत एसटीचा अक्षरश चक्काचूर झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की एसटीचा अक्षरश चक्काचूर झाला आहे.या अपघातामुळे दुचाकी आणि एसटी बसमधील प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना आता उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परशूराम घाटात ही संपूर्ण घटना घडली आहे. या अपघातानंतर महामार्गावर एकेरी वाहतूक सूरू आहे.
मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात
मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात
advertisement

कोकण पट्ट्यात संध्या थंडीने जोर पकडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पहाटे धुक्याचे साम्राज्य असते. या धुक्यांमुळे अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशात आज मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण ला जोडणाऱ्या परशुराम घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे पहाटे 6 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे.

advertisement

एसटी बस, कंटेनर, कार आणि दुचाकी या अशा चार वाहनांनी एकमेकांना भीषण धडक दिली.या धडकेत एसटीचा अक्षरश चक्काचूर झाला आहे. तसेच एसटी आणि दुचाकीवर असलेले चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना आता उपचाराकरता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे सध्या या प्रवाशांवर उपचार सूरू आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

या अपघातानंतर महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सूरू केला आहे. तसेच या अपघातानंतर सध्या मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सूरू ठेवण्यात आली आहे.तसेच दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दाट धुकं पडलं, रस्ताच दिसला नाही अन् अनर्थ घडला; चार वाहनांच्या विचित्र अपघातात चौघांचा...मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल