TRENDING:

मुंबईत हालचालींना वेग, महापौर निवडीचा सस्पेन्स वाढला, रात्रीच्या बैठकीत उलथापालथ

Last Updated:

मुंबईत आरक्षण सोडतीची घोषणा होऊन दोन दिवस झाले आहेत. मात्र अद्याप मुंबईत महापौर पदासाठी महायुतीकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचं दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी 'खुला प्रवर्ग' (महिला) जाहीर झाला आहे. आरक्षण सोडतीची घोषणा होऊन दोन दिवस झाले आहेत. मात्र अद्याप मुंबईत महापौर पदासाठी महायुतीकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचं दिसत आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्याप एकमत न झाल्याने आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ३१ जानेवारी रोजी होणारी महापौर निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
News18
News18
advertisement

मुंबई महापालिकेत सध्या भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ असे एकूण ११८ नगरसेवक महायुतीकडे आहेत. नियमानुसार बहुमतासाठी लागणारा आकडा महायुतीकडे असला तरी सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षात मतभेद असल्याची माहिती आहे. शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे यांनी यापूर्वीच कोकण भवनात जाऊन आपली अधिकृत गटनोंदणी केली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्याप आपली अधिकृत गटनोंदणी केलेली नाही. महापौर पदाच्या निवडीसाठी ही नोंदणी अनिवार्य असते. असं असूनही अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्याचं दिसत आहे.

advertisement

महापौर पदावरून रस्सीखेच

महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी (महिला) आरक्षित झाल्याने भाजपमधून अनेक मातब्बर नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला शिवसेनेने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. शिवसेनेचे हे 'मौन' आणि भाजपमधील इच्छुकांची मोठी संख्या यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महापौरपदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. मात्र, रात्री उशिरा वरिष्ठ पातळीवर झालेल्या राजकीय खलबतांनंतर ही निवडणूक नियोजित तारखेला न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
म्हणून सायकल घेऊन निघालो, पुण्याच्या सायकल टूरमध्ये एंट्री करणारे आप्पा आले समोर
सर्व पहा

भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्याप महापौर कोणाचा, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. शिवाय दोन्ही पक्षांनी गटनोंदणी देखील केलेली नाही. अशात महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख अचानक चेंज केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत हालचालींना वेग, महापौर निवडीचा सस्पेन्स वाढला, रात्रीच्या बैठकीत उलथापालथ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल