TRENDING:

Bullet Train: वेगाला फुटणार पंख! मुंबई-पुणे बुलेट ट्रेन केवळ प्रवासच नाही, तर महाराष्ट्राचं नशीबही बदलणार; हे 5 मोठे फायदे

Last Updated:

४८ मिनिटांत मुंबई-पुणे आणि अवघ्या तीन तासांत पुणे-हैदराबाद गाठणाऱ्या या बुलेट ट्रेनचे नेमके फायदे काय आहेत, याचा हा सविस्तर आढावा घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : बोरिवलीहून चर्चगेटला पोहोचण्यापूर्वीच तुम्ही मुंबईहून पुणे गाठाल, हे आता केवळ स्वप्न राहिलेलं नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई-पुणे-हैदराबाद प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे. ४८ मिनिटांत मुंबई-पुणे आणि अवघ्या तीन तासांत पुणे-हैदराबाद गाठणाऱ्या या बुलेट ट्रेनचे नेमके फायदे काय आहेत, याचा हा सविस्तर आढावा घेऊ.
बुलेट ट्रेनचे फायदे (AI Image)
बुलेट ट्रेनचे फायदे (AI Image)
advertisement

1. वेळेची बचत

सध्या रस्ते मार्गे (एक्सप्रेसवे) किंवा रेल्वेने मुंबई-पुणे प्रवासासाठी ३ ते ५ तास लागतात. बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या ४८ मिनिटांत पार होईल. पुणे-हैदराबाद हा ८ ते १० तासांचा प्रवास फक्त 2-3 तासात पूर्ण होईल. यामुळे प्रवाशांचा दिवसातील ७०% वेळ वाचणार आहे.

2. 'ट्विन सिटी' संकल्पना होणार साकार

advertisement

मुंबई आणि पुणे ही दोन शहरे आता खऱ्या अर्थाने 'जुळी शहरे' होतील. एखादी व्यक्ती पुण्यात राहून मुंबईत सहज नोकरी करू शकेल आणि दररोज परत येऊ शकेल. यामुळे मुंबईवरील घरांचा आणि लोकसंख्येचा ताण कमी होऊन पुण्याच्या आसपासच्या उपनगरांचा विकास होईल.

3. उद्योग आणि आयटी क्षेत्राला 'बूस्टर डोस'

मुंबई (आर्थिक राजधानी), पुणे (आयटी आणि ऑटो हब) आणि हैदराबाद (टेक सिटी) ही तीन महत्त्वाची शहरे एकाच वेगाच्या सूत्रात बांधली जातील. वेगवान कनेक्टिव्हिटीमुळे गुंतवणूक वाढेल, मालाची ने-आण जलद होईल आणि नवीन स्टार्ट-अप्सना चालना मिळेल.

advertisement

4. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातून सुटका

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण बुलेट ट्रेनमुळे कमी होईल. तसेच ही ट्रेन विजेवर चालणारी असल्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल, जे पर्यावरणासाठी अत्यंत पूरक ठरेल.

5. आरामदायी आणि सुरक्षित प्रवास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

प्रगत सिग्नलिंग आणि स्वतंत्र ट्रॅकमुळे अपघाताची शक्यता शून्य असेल. विमानासारखी आरामदायी आसने, शांत वातावरण आणि 'लो-व्हायब्रेशन' (कमी कंपन) तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा थकवा कमी होईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bullet Train: वेगाला फुटणार पंख! मुंबई-पुणे बुलेट ट्रेन केवळ प्रवासच नाही, तर महाराष्ट्राचं नशीबही बदलणार; हे 5 मोठे फायदे
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल