Rain Live Update: लोकल वाहतूक विस्कळीत, अनेक लोकल गाड्या एकामागे उभ्या, ट्रॅकवर साचलं पाणी
मुंबईला पावसानं झोडपून काढलंय.पहाटेपासूनच मुंबईच्या विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक महत्वाच्या ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरणामुळे काळोख पसरला आहे. जेजे फ्लायवर, दादर, अंधेरी, सायन किंग्स सर्कल, महालक्ष्मी अशा विविध परिसरात पाणी साचलंय.अंबरनाथ – बदलापूर या भागातही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत…सार्वजनिक वाहतूक सेवेसह रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झालाय..त्यामुळे सकाळीच चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आलीय..