एका गँगस्टरच्या मुलीला अशा प्रकार नरक यातना भोगाव्या लागल्याने एकच खळबळ उडाली होती. आता हाजी मस्तानच्या मुलानं नवा व्हिडीओ शेअर कर केला आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिने सरकारकडे सरकारी वकील देण्याची विनंती केली आहे. आपल्याकडे कसलाही इनकम सोर्स नाहीये. आपण कर्ज काढून ही केस रिओपन करत आहे. पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे आपल्याला सरकारी वकील द्यावा, अशी विनंती हसीना मस्तान यांनी केली आहे.
advertisement
नवीन व्हिडीओत हसीना मस्तान काय म्हणाली?
पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याची माहिती देतान हसीना मस्तान म्हणाली, "माझी सरकारला विनंती असेल की पुढील न्यायालयीन लढाईसाठी मला सरकारी वकील द्यावा. मी कर्ज काढून माझी केस पुन्हा ओपन करत आहे. मला नेहमी कुणी कर्ज देणार नाही. माझ्याकडे कोणताही इनकम सोर्स नाहीये किंवा माझ्याकडं असं कोणतंही काम नाही, की ज्यातून मी माझी पुढील लढाई आरामात लढू शकेन. त्यामुळे माझी विनंती आहे की मला सरकारी वकील द्यावा, यामुळे मी कोणत्याही अडचणींशिवाय ही केस जिंकू शकेल. ही केस मी जिंकणार, हे मला माहीत आहे. या देशाची मुलगी असल्याने मी पंतप्रधानांकडे ही मागणी करत आहे. जय हिंद..."
प्रकरणात वडिलांचं नाव खेचल्यानं व्यक्त केली खंत
हसीना यांनी या संपूर्ण प्रकरणात तिचे वडील हाजी मस्तान यांना वारंवार खेचू नये असं आवाहन माध्यमांना केलं. ती म्हणाली, "ही माझ्या वडिलांची कहाणी नाही. हे सर्व त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी घडलं. मी त्यांची मुलगी आहे, पण हा माझा वैयक्तिक संघर्ष आहे. तिच्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी केल्या. तिच्यावर यापूर्वी अनेकदा हल्ल्याचे प्रयत्न झाले. तरीही ती जिवंत आहे.
हाजी मस्तान कोण होता?
हाजी मस्तान मिर्झा याचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला होता. तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये एक प्रसिद्ध नाव होता. रिअल इस्टेट आणि सागरी तस्करी व्यवसायात सक्रिय होता. त्याचे दाऊद इब्राहिमसह अनेक अंडरवर्ल्ड व्यक्तींशी संबंध असल्याचे सांगितले जाते. हाजी मस्तानचे २५ जून १९९४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
