नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास घडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक तरुण एका तरुणीला जबरदस्तीने रस्त्यावरून ओढत नेत आहे. ती तरुणी वारंवार स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तो तरुण तिला सोडत नव्हता. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कुणीच नव्हतं. ज्याचा फायदा या तरुणाने घेतला.
advertisement
भररस्त्यावर सुमारे १० ते १५ मिनिटं हा थरार सुरू होता. सुदैवाने, परिसरातील एका जागरूक नागरिकाला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी खिडकीतून जोराने आवाज दिल्यानंतर संबंधित तरुण आणि तरुणी तिथून निघून गेले. या व्हिडीओतील काही दृश्य पीडित तरुणीच्या प्रायव्हसीचा भंग करणारे आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ न्यूज १८ मराठीकडून पब्लिश करण्यात आला नाही.
पाच दिवसांनंतर व्हिडिओ व्हायरल
घटनेच्या पाच दिवसांनंतर हे फुटेज समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात पोलिसांची रात्रीची गस्त नेमकी कुठे असते? असा सवाल आता विचारला आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. हे तरुण आणि तरुणी नेमके कोण होतं? ते एकमेकांना ओळखत होते का? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.
