TRENDING:

दारूची बाटली देण्याच्या छोट्या खिडकीतून चोर आता शिरला, नागपूरचा CCTV VIDEO

Last Updated:

Nagpur: दारूची बाटली देण्याच्या छोट्याश्या खिडकीतून चोर आत घुसल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: दारूच्या दुकानात बाटली देण्याच्या अर्थात दारु विक्री करणाऱ्या खिडकीतून एकाने चक्क आत घुसून चोरी केली. या चोरीचा भन्नाट सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. शेख राजा बाबा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नागपूर CCTV
नागपूर CCTV
advertisement

हा व्हिडीओ नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशच्या हद्दीतील दारूच्या दुकानातील आहे. यात 6 जूनला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत घुसला. यात दारूची बाटली देण्याच्या छोट्याश्या खिडकीतून तो आत घुसला. आतमध्ये शिरल्यानंतर काऊंटरमध्ये असलेल्या गल्ल्यातून रोख रक्कम घेऊन तो फरार झाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

यापूर्वी आरोपीने अमरावती येथेही वाहन चोरी केल्यास तपासत उघडकीस आले आहे. आताच्या व्हिडीओत, दारुच्या दुकानात लावलेल्या काऊंटर समोरील लोखंडी जाळीतून दारूची बाटली मोठ्या कठीण पध्दतीने जाऊ शकते, अश्या छोट्याश्या खिडकीतून आत जाऊन त्याने चोरी केली. या चोराने दुकानांतून जवळपास २५ हजारची चोरी केली होती आणि याला नागपूर पोलिसांच्या क्राईम युनिट ४ पथकाने अटक केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दारूची बाटली देण्याच्या छोट्या खिडकीतून चोर आता शिरला, नागपूरचा CCTV VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल