TRENDING:

Video: एम.टेकपर्यंत शिक्षण, सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी पण एका नादाने वाया गेला, पोलिसांनी अद्दल घडवली

Last Updated:

Nagpur Crime News: आशिष रेड्डीमल्ला (वय २५) असे आरोपीचे नाव असून तो चंद्रपूरमधील रयतवारी कॉलनीचा रहिवासी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : उच्च शिक्षित असलेल्या मात्र जुगार खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे चोर बनलेल्या चोरट्याला नागपूरच्या धंतोली पोलिसांनी अटक केली. उच्चशिक्षित चोरट्याने एम.टेकपर्यंत शिक्षण घेतले होते. तसेच मिहानमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत काम केले होते.
नागपूर क्राइम बातम्या
नागपूर क्राइम बातम्या
advertisement

आशिष रेड्डीमल्ला (वय २५) असे आरोपीचे नाव असून तो चंद्रपूरमधील रयतवारी कॉलनीचा रहिवासी आहे. जुगार खेळण्याचे व्यसन लागल्याने तो कर्जबाजारी झाला होता. आशिषने 2023 मध्ये नोकरी सोडली आणि तो चोरी करू लागला.

जुगाराच्या नादात घरफोड्या करू लागला, उच्चशिक्षित चोरट्याची गोष्ट

आशिष रेड्डीमल्ला हा सध्या नागपुरात राहत होता आणि तो चोऱ्या करत होता. आतापर्यंत त्याने पाच ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नागपुरातील छत्रपती चौकाच्या आसपास असलेल्या परिसरात तो चोऱ्या करून जुगार खेळायचा. त्याच्या कडून २ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

advertisement

उच्च शिक्षित असला तरी जुगाराच्या खेळाच्या नादात तो चोर बनला. याआधी देखील त्याला दोन वेळा पोलिसांनी अटक केली होती. आता तिसऱ्या वेळी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळील मुद्देमाल जप्त केला आहे.

खबऱ्यांकडून माहिती मिळाली, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

शीतल चिंतेनवार यांच्या तक्रारीनुसार, दोन दिवसांसाठी चंद्रपूरला गेल्यानंतर त्यांच्या घरात घरफोडी झाली होती. याच्याआधीही दोन वेळा घरात घरफोडी झाली होती. तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही खबऱ्यांकडून माहिती घेतली असता मिळालेल्या माहितीनुसार आम्ही आरोपीचा शोध घेतला असता, त्याचा ठावठिकाणा आम्हाला मिळाला. आम्ही आशिषबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, याआधीही चोरीच्या गुन्ह्यात त्याला दोन वेळा पोलिसांनी अटक केली होती. आशिष उच्चशिक्षित असून त्याने एमटेक केले आहे. तो मिहानमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत कामालाही होता, अशी माहिती नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अनामिका मिरजापुरे यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: एम.टेकपर्यंत शिक्षण, सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी पण एका नादाने वाया गेला, पोलिसांनी अद्दल घडवली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल