सकाळी ८ वाजता झाला गोळीबार
मिळालेली माहिती अशी की, गुमगाव परिसरात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. गावातील गज्जू नावाच्या व्यक्तीचा देवतळे कुटुंबाशी जुना घरगुती वाद होता. याच वादाचे पर्यावसान हिंसक वळणात झाले. रागाच्या भरात असलेल्या आरोपी गज्जूने थेट बंदूक काढून गोळीबार सुरू केला.
दोन राऊंड फायरिंग, तिघे जखमी
advertisement
या गोळीबारात प्राध्यापक नितीन देवतळे, प्रविण देवतळे आणि त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गोळी लागल्याने जखमी झाला आहे. आरोपीने एकूण दोन राऊंड फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एका जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भरदिवसा आणि भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण गुमगाव परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पोलीस तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गज्जू याने कोणत्या कारणावरून इतकं टोकाचं पाऊल उचललं आणि त्याच्याकडे शस्त्र कोठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
