TRENDING:

Nagpur News: कामगारांचा आक्रोश आणि रक्ताचा सडा! नागपुरात डिटोनेटर कंपनीत मृत्यूचे तांडव, १५ जणांचा बळी

Last Updated:

Nagpur Blast: राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत सकाळी ७ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत सकाळी ७ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत एका महिला कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मृतांचा आकडा १५ पर्यंत पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.
राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत सकाळी ७ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा
राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत सकाळी ७ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा
advertisement

डिटोनेटर बनवताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली. खाणींमधील खोदकामासाठी लागणारे डिटोनेटर तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि परिसरात धुराचे लोट पसरले.

१८ कामगार जखमी; जखमींमध्ये सर्व महिला

advertisement

स्फोटाच्या वेळी कंपनीच्या संबंधित युनिटमध्ये २५ ते ३० कामगार कार्यरत होते. या दुर्घटनेत १८ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये सर्व महिला कामगारांचा समावेश आहे. त्यापैकी ४ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

advertisement

मृतांचा आकडा वाढण्याची भीती  

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

घटनेची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की मृतांची संख्या १५ पर्यंत गेला आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur News: कामगारांचा आक्रोश आणि रक्ताचा सडा! नागपुरात डिटोनेटर कंपनीत मृत्यूचे तांडव, १५ जणांचा बळी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल