गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याचे चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणल. मात्र, संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा भडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचार बंदी लागू केली आहे. तर, दुसरीकडे नागपूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
मास्टरमाईंड कोण?
पोलिसांच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आलेला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर फहीम खान नमाक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनानंतर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान हा 50-60 जणांसोबत गेला होता, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. फहीम खान याने 2024 नागपूर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याची अमानत रक्कमही जप्त झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फईम खान याचाही समावेश आहे. फहीम खानच्या चिथावणीने जमाव हिंसक झाला असल्याचा आरोप आहे. त्यामुळे फहीम खान हाच मास्टरमाईंड आहे का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
