TRENDING:

२ दिवसांपासून दरवाजा बंद, मित्रांना संशय, दार उघडताच भयंकर चित्र, MBBS विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

Last Updated:

Nagpur News: संकेत दाभाडे एम्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाहीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वृषभ फरकुंडे, नागपूर : नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. संकेत दाभाडे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नागपूर विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल
नागपूर विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल
advertisement

संकेत दाभाडे एम्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. एम्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या पाचव्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या संकेतने बाथरूमच्या दरवाजाला शॉल बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

मागील दोन दिवसापासून त्याच्या रूमचा दरवाजा बंद होता. आतमध्ये कसलीही हालचाल नव्हती. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी शंका आल्याने त्यांनी वार्डनला याबाबतची माहिती दिली. वॉर्डनला सांगून दरवाजा उघडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

संकेत दाभाडे याच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२ दिवसांपासून दरवाजा बंद, मित्रांना संशय, दार उघडताच भयंकर चित्र, MBBS विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल