TRENDING:

टीप मिळाली अन् समीर येडाच्या मारेकऱ्याचा खेळ खल्लास, अस्सू टोळीचा मुख्य हल्लेखोर अटकेत

Last Updated:

नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित समशेर खान उर्फ 'समीर येडा' हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित समशेर खान उर्फ 'समीर येडा' हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. भव्य श्याम यादव (२२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मंगळवारी तो परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला गणेशटेकडी परिसरातून बेड्या ठोकल्या.
News18
News18
advertisement

तांदूळ तस्करी आणि वर्चस्व वादातून खून

ऑगस्ट २०२५ मध्ये यशोधरा नगर उड्डाणपुलाजवळ समशेर खान (३०) उर्फ समीर येडा याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तांदळाच्या तस्करीतून निर्माण झालेला वाद आणि टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातून 'अस्सू टोळीने' हा खून केला होता. या प्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, मात्र भव्य यादव फरार होता.

advertisement

पोलिसांचा फिल्मी स्टाईल सापळा

आरोपी भव्य यादव हा मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने परराज्यात पळून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेशटेकडी मंदिर रस्त्यावरील बसस्थानक परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली. तो बसस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले.

या पथकाने केली कारवाई

advertisement

ही धाडसी कारवाई विशेष पथकाचे हवालदार श्याम कडू, कुणाल कोरचे तसेच यशोधरानगर पोलीस ठाण्याचे राहुल बोंद्रे, सितेश चौरसिया आणि विकास बेंद्रे यांच्या पथकाने केली. गेल्या चार महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.

गुन्हेगारी विश्वात खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांतीसाठी घेवर आणि फेनी, जालन्यात अतिशय प्रसिद्ध पदार्थ, इथं भरतंय बाजार
सर्व पहा

समीर येडा याच्या हत्येनंतर नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता मुख्य मारेकरी जेरबंद झाल्यामुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता या हत्येमागे आणखी कुणाचा हात होता का? याचा अधिक तपास करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टीप मिळाली अन् समीर येडाच्या मारेकऱ्याचा खेळ खल्लास, अस्सू टोळीचा मुख्य हल्लेखोर अटकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल