नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव गावातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. दुपारच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना शाळेत पडलेला प्लास्टिक कचरा उचलण्यास सांगण्यात आले. मात्र दोन विद्यार्थ्यानींनी तो आदेश न पाळल्याने शिक्षिकेने संतापून त्याला वर्गातच बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे विद्यार्थिनींच्या पाठीवर आणि हातावर जखमा झाल्या आहेत. यातील एक विद्यार्थिनी मारहाणीमुळे बेशुद्ध झाली होती, दोन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिला सुट्टी देण्यात आली आहे, तर दुसऱ्या विद्यार्थीनिला मारहाणीमुळे व्रण उमटले आहे. या आधी देखील आरोपी शिक्षिका मनिषा चौधरीने मुलींना मारहाण केली होती, त्यावेळी पालकांनी केलेल्या तक्रारीचा राग मनात असल्याने जबर मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
advertisement
शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई
शिक्षण द्यायचं सोडून मुलांना अशा प्रकारे मारहाण करायची, हे अजिबात योग्य नाही. आम्ही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून शाळेतील कामे करून घेणे हा गुन्हा मानला जाते. तरीदेखील शाळेत विद्यार्थ्यांना कचरा उचलण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आरोपी शिक्षिका मनिषा चौधरीवर निलंबनाची कारवाई केली आहे.
व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या संदर्भात नागपूर मधील कोंढाली पोलीस स्टेशन मध्ये आरोपी शिक्षिका मनीषा चौधरी विरोधात गुन्हा दाखल असून पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं सोडून त्यांच्याकडून कचरा उचलण्याचं काम करवून घेणं, आणि नकार दिल्याबद्दल मारहाण करणं, हा प्रकार न धक्कादायक आहे. या घटनेमुळे शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.