या घटनेत कार चालवत असलेल्या तरुणाच्या मांडीवर बसून तरुणी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अतिशय धोकादायक पद्धतीने तरुणी स्टेरिंगवर बसून अश्लील चाळे करत असल्याचं दिसत आहे. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता होती. जोडप्याने स्वतःसोबतच इतरांचाही जीव धोक्यात घातला.
रिल बनवण्यासाठी समृद्धी महामार्गावरच नको ते कृत्य; छ. संभाजीनगरमधील 5 तरुणांना अटक
advertisement
रस्त्याने जाणारे येणारे लोक बघत असतानाही दोघांचे अश्लील चाळे सुरूच होते. लक्ष्मीभुवन चौक ते शंकर नगर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनीही कारवाई केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी वाहनाचा शोध घेत प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा प्रियकर तरुण हा CA तर प्रेयसी इंजिनिअर असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. दोघेही सीताबर्डी परिसरात गेले होते. रेस्टॉरंटमध्ये काही वेळ घालवल्यानंतर रस्त्याने परत जाताना त्यांनी हे चाळे केले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यात कारचा क्रमांकही दिसला. पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून सूरजच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी कार सूरजकडे असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सूरजला बोलवलं.