रिल बनवण्यासाठी समृद्धी महामार्गावरच नको ते कृत्य; छ. संभाजीनगरमधील 5 तरुणांना अटक
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
संभाजीनगरमधील एक रील व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये हातात रिव्हॉल्व्हर घेऊन एका टोळक्याने सिनेस्टाईल रील बनवल्याचं पाहायला मिळतं
छत्रपती संभाजीनगर (अविनाश कानडजे, प्रतिनिधी) : आजकाल सोशल मीडिया आणि रिल्सचं क्रेझ प्रचंड वाढलं आहे. तरुणाईमध्ये तर याचं प्रचंड वेड आहे. रिल्स बनवण्यासाठी लोक अगदी काहीही करायला तयार असतात. अगदी आपला जीव धोक्यात टाकावा लागला, तरीही ते मागेपुढे पाहात नाही. रिल्स बनवताना झालेल्या भयंकर दुर्घटनांचे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. मात्र, यातूनही हे लोक काही धडा घेत नाहीत.
आता छत्रपती संभाजीनगरमधूनही एक अशीच घटना समोर आली आहे. यात संभाजीनगरमधील एक रील व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये हातात रिव्हॉल्व्हर घेऊन एका टोळक्याने सिनेस्टाईल रील बनवल्याचं पाहायला मिळतं. ही रील माळीवाडा परिसरातील समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आली असून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
advertisement
समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्याया रीलची चर्चा आणि रील पोलिसांपर्यंत पोहचली. मग काय पोलिसांनीही लगेचच कारवाई करत जिंसी भागातील पाच तरुणांना ताब्यात घेतलं आहे. इतरर दोन जण दोन रिव्हॉल्व्हरसह फरार झाले आहेत. आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे..रीलमध्ये दिसणाऱ्या रिव्हॉल्व्हर खऱ्या आहेत का? मग त्या कुठून आणल्या आणि आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारांची आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
advertisement

जोडप्याची पुलावरुन उडी -
रील्ससंदर्भातील आणखी एक घटना नुकतीच समोर आली होती. यात राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणवला जाणारा गोरामघाट एका दाम्पत्यासाठी अतिशय धोकादायक ठरला. रेल्वे ट्रॅकवर रील बनवत असलेल्या पती-पत्नीने अचानक समोरून ट्रेन आल्याचं पाहिलं. हे पाहून ते घाबरे आणि जीव वाचवण्यासाठी खोल खड्ड्यात उडी घेतली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. प्रकृती गंभीर असल्याने पती राहुलला सोजत येथून जोधपूरला रेफर करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालयात पोहोचले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2024 7:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रिल बनवण्यासाठी समृद्धी महामार्गावरच नको ते कृत्य; छ. संभाजीनगरमधील 5 तरुणांना अटक