IND vs NZ : आज बॅट चालली नाही, तर T20 वर्ल्ड कप बेंचवरच जाणार! टीम इंडियाच्या स्टारला शेवटची संधी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 मॅचच्या टी-20 सीरिजला सुरूवात झाली आहे. नागपूरमेध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 रननी पराभव केला.
टी-20 वर्ल्ड कपआधी भारतीय टीमकडे तयारी पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उरलेल्या 4 सामन्यांनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची बॅट शांत राहिली, त्यामुळे या खेळाडूला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रन करावे लागणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रायपूरमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत एकमेव टी-20 मॅच खेळली, ज्यात त्यांना विजय मिळाला. 2023 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रायपूरमध्ये टी-20 मॅच झाली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने त्या सामन्यात 174 रन केले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 154 रनपर्यंतच मजल मारता आली.
advertisement
advertisement










