Shani Shukra Yuti 2026: कष्टाला नशिबाची साथ! 28 जानेवारीनंतर या राशींचे दिवस पालटणार, शनी-शुक्राचा अर्धकेंद्र योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Shukra Yuti 2026: राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होत असण्याशिवाय काही विशिष्ट कोणही तयार होतात. ज्योतिषीय गणनेनुसार, 28 जानेवारी रोजी सकाळी साधारण 7 वाजून 29 मिनिटांनी शनि आणि शुक्र यांच्यात एक विशेष कोन तयार होईल, ज्याला अर्धकेंद्र योग म्हटले जाते. या काळात शुक्र मकर राशीमध्ये असून सूर्य, मंगल आणि बुध यांच्यासोबत शक्तिशाली स्थितीत असेल. शनि आणि शुक्र यांच्या या संयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग अनेक चांगल्या शक्यता घेऊन येईल. या वेळी शनि तुमच्या राशीत आणि शुक्र लाभ भावात प्रभाव टाकत आहेत, ज्यामुळे नशीब तुम्हाला साथ देईल. मनातील अनेक दिवसांपासूनची अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो आणि वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाच्या जोरावर पुढे जाण्याची संधी मिळेल. पगारवाढ किंवा पदोन्नतीची स्थिती निर्माण होऊ शकते. परदेशाशी संबंधित करिअरच्या संधीही मिळू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










