आकर्षक हेअर अॅक्सेसरीज, फक्त 50 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
केवळ 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींमुळे या स्टॉलकडे महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई : दादर परिसरात महिलांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या हेअर अॅक्सेसरीज अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देणारा एक स्टॉल सध्या महिलांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. केवळ 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींमुळे या स्टॉलकडे महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ तसेच दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असलेल्या आकर्षक आणि ट्रेंडी अॅक्सेसरीज येथे उपलब्ध असल्याने हा स्टॉल महिलांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
या स्टॉलवर विविध प्रकारचे हेअर ब्रोच उपलब्ध असून साधे तसेच मण्यांपासून बनवलेले आकर्षक हेअर ब्रोच 30 ला एक आणि 50 ला दोन या दरात विक्रीस ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, केस सजवण्यासाठी वापरले जाणारे आर्टिफिशियल गजरे 20 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पारंपरिक लूकसाठी उपयुक्त असलेल्या वेण्या 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत मिळत असून विविध रंग, डिझाइन आणि आकारांमध्ये त्यांची मोठी रेंज येथे पाहायला मिळते.
advertisement
फुलांची आवड असलेल्या महिलांसाठी गुलाबाची कृत्रिम फुले देखील येथे उपलब्ध असून ती 30 ला एक आणि 50 चे 2 या दरात विकली जात आहेत. यासोबतच विविध प्रकारची इतर कृत्रिम फुलेही या स्टॉलवर मिळत आहेत, जी सण-समारंभ, पूजा किंवा खास कार्यक्रमांसाठी वापरता येतात. गंगावन, अंबोडा तसेच नथीच्या आकारातील साडी पिन्सही येथे 60 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत हे या स्टॉलचे आणखी एक खास आकर्षण मानले जात आहे.
advertisement
कमी किमतीत विविध डिझाइन्स आणि दर्जेदार अॅक्सेसरीज उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थिनी, नोकरदार महिला तसेच गृहिणी यांच्यासाठी हा स्टॉल खरेदीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दादर परिसरातील हा स्टॉल कबूतर खाना दादर डिपार्टमेंट स्टोअरच्या समोर, कीर्तीकर मार्केट गल्ली नंबर 3 येथे आहे. महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या माफक दरातील हेअर अॅक्सेसरीजमुळे दादरमधील हा स्टॉल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 3:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आकर्षक हेअर अॅक्सेसरीज, फक्त 50 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?









