ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "पं.मोदींनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना एक त्यांच्यासोबतचा फोटो ट्वीट केला.बाळासाहेब त्यांचे कसे मार्गदर्शक होते, त्यांच्याकडून आम्ही कशी उर्जा घेतली.त्यांनी देशाला कशी दिशा दाखवली.अशी भूमिका शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहताना पाठवली. त्याच मोदींनी बाळासाहेबांची तोडली फोडली आणि एकनाथ शिंदे या व्यक्तीला बसवलं. आता मोदी शिंदेंकडून उर्जा प्रेरणा घेतात का ? असा प्रश्न आहे. "



